एकीकडे आपण स्त्री सशक्तीकरण वगैरेच्या मोठ मोठ्या गप्पा करत असताना जेव्हा दुसरीकडे बलात्कारासारख्या अमानवीय घटना समोर येतात तेव्हा खरच प्रश्न पडतो आपण नेमकी चालतो तरी कोणत्या दिशेने. कोपर्डीतील घटनेच्या जखमा कुठे भरू पाहतच होत्या कि अजून एक ह्रदयाला हेलावून टाकणारी घटना समोर आली. हैदराबाद येथील भारतीय तरुणीबरोबर घडलेला प्रसंग कानी पडला आणि मन अगदी सुन्न झाले. 

Women Rape Incidents - स्त्री बलात्कार घटना


प्रसारमाध्यमांद्वारे या प्रकरणाबद्दल अधिक माहिती घेत असताना आढळले कि बहुसंख्य लोकांना पडलेले प्रश्न कोणते तर कुठे? केव्हा? आणि कसे?. खरे तर हे सर्व समोर असताना आपल्याला गरज आहे एका प्रश्नाचे उत्तर शोधण्याची आणि तो प्रश्न म्हणजे ‘का’? कोणती अशी निकरीची वेळ येते कि माणसातील सैतान जागा होतो आणि असले दुष्कर्म करण्याची दुर्बुध्दी होते. 


अशा घटनांकडे बघतांना वेग वेगळे मत प्रवाह समोर येताना दिसतात. जुन्या अनिष्ट विचारांनी बुरसटलेली डोकी मग याचे खापर आजच्या मुलींच्या राहणीमानावर आणि पेहनाव्यावर सोडून मोकळे होतात. खरे तर या सबबींचा संबंधच अशा अमानवीय घटनांशी जोडणे संपूर्णतः चुकीचे आहे. पुरुष असण्याची मस्ती जेव्हा डोक्यात शिरते तेव्हा असले नराधम तयार होतात. 

Women Safety - स्त्री संरक्षण


कायद्याचे राज्य असावे असे सर्वांनाच वाटते पण आपण याचा किती अंमल करतो हा मोठा प्रश्न आहे. खरे तर कायदा हा सर्वांना मुक्तपणे जगण्याची मुभा देतो पण बरेच लोक याचा गैरफायदा उचलताना दिसतात. गेले कित्येक शतके स्त्री ही जुन्या रूढी आणि परंपरांमुळे नेहमीच अंधारात आयुष्य जगलेली. आज कुठे तिच्या उमेदीचे पंख खुलत असतांना अशा बलात्काराच्या घटना  परत समाजास अंधारात घेऊन जातात. 


गेल्या काही दशकांमध्ये असल्या घटना ह्या वाढतच चालल्या आहे. याची वेग वेगळी कारणे सांगितली जातात पण खरं तर कायद्याचा कुठलाही धाक नसल्यामुळे हे सर्रास घडत आहे. गुन्हेगारी प्रवुत्ती नष्ट करण्यासाठी प्रबोधनाद्वारे मनपरिवर्तन वगैरे असल्या बाजार गप्पांना काहीही अर्थ उरलेला नाही. असले दुष्कर्म करणाऱ्या नराधमांना मृत्युदंड देणे हेही आता अपुरे वाटते. याचे कारण अपराध्यांना मृत्युदंडाची शिक्षा तर होते पण त्याचा अंमल होण्यासाठी कित्येक वर्ष पालटली जातात. 

Women Empowerment - स्त्री सशक्तीकरण


आज गरज आहे ती एका सशक्त अशा कायद्याची ज्यात असल्या नराधमांना ताबडतोब मृत्युदंडाची शिक्षा अंमलात आणता येईल. आशा करूया की आपली सर्वोच्च न्यायसंस्था लवकरच या दृष्टीने पावले उचलेल आणि स्त्री जातीच्या खऱ्या सशक्तीकरणाला वाव मिळेल. 

6 COMMENTS

 1. It’s actually a nice and useful piece of information. I’m glad
  that you just shared this useful information with us.
  Please stay us informed like this. Thanks for sharing.

 2. If some one wants expert view concerning blogging after that
  i advise him/her to pay a visit this weblog, Keep up the nice
  job.

 3. I am extremely impressed with your writing skills and also with the layout in your blog.

  keep up the excellent quality writing, it is rare to see a great blog like this one
  these days..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here